Saturday, 31 October 2020

पती पत्नी

                   💝 पती पत्नी 💝

पत्नीमध्ये अनेकदा दोघेही आपापल्या ठिकाणी जरी योग्य असले तरी परस्परांसाठी अयोग्य ठरतात. केवळ आपापसातील विरोधाभासांमुळे कितीतरी नाती तुटतात. क्षुल्लक कारणांवरुन काडीमोड घेण्यापेक्षा विरोधाभासाची ही दरी भरुन काढणे गरजेचे आहे. पती-पत्नीचे नाते सर्वस्वी विश्वास आणि प्रेम यावर अवलंबून असते. वेळोवेळी कसोटीचे क्षण असतात. कुठल्या क्षणी कसे वागावे हे नीट कळायलाच हवे. संसाराच्या वाटेवर चालताना प्रत्येक पाऊल सांभाळून पडायला हवे. तरच ही वाट आनंदायी होऊ शकते. संसार सुखाचा होण्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टी टाळायला हव्या त्याबाबत जाणून घेऊया.


आळशीपणा : एकमेकांच्या प्रेमात असतानाचे सोनेरी दिवस आठवून बघा. किती वेळ दिला जायचा? तो किंवा ती आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत? हे वारंवार जमेल त्या प्रत्येक पद्धतीने पटवून देण्याचा आपला प्रयत्न असायचा. संसाराच्या रहाटगाड्यात मात्र आपण इतके गुंतून जातो की साथीदाराविषयीच्या भावना व्यक्त करण्याचा कंटाळा करायला लागतो. हे चुकीचे असून मनातल्या भावना आजही पूर्वीप्रमाणेच वेळोवेळी व्यक्त करायला हव्यात. कधीतरी स्वतःहून आपल्या साथीदारासाठी काहीतरी प्लॅन करायला हवे.  आठवडयातून एखादवेळी सरप्राईज डिनर, अनपेक्षित दिलेली एखादी भेटवस्तू, दिसण्याचे केलेले कौतूक या आणि अशाच काही गोष्टी नाते टवटवीत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात.


संशयी वृत्ती : आपला नवरा किंवा बायको जर सतत लॅपटॉप किंवा मोबाइलवर वेळ घालवत असेल तर मनात शंका येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी तो किंवा ती कुणाला व काय मॅसेज करतात यावर लक्ष ठेवण्याची अनेकांची प्रवृत्ती असते. नेमकी हीच प्रवृत्ती नात्यातला विश्वास गमावण्यास पुरेशी ठरते. कारण बरेचदा आपली शंका निव्वळ आपला भ्रम असतो. त्यामुळे प्रेमाच्या नादात आपण आपल्या साथीदाराचे स्वातंत्र्य तर हिसकावून घेत नाही ना हे पडताळून पहावे. अन्यथा नाते घुसमटून संपण्याची शक्यता असते.


‘एक्स’ बरोबरचे संबंध : लग्नापूर्वी जर त्याचे किंवा तिचे कुणाशी प्रेमसंबंध असतील तर लग्नानंतर ते कटाक्षाने टाळावेत. जर त्याबाबत तुमच्या साथीदाराला माहिती असेल  पण त्यापुढे जाऊन मर्यादा सोडून वागणे चुकीचे आहे. नवरा-बायकोचे नाते अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे निभवावे लागते. त्यामुळे भूतकाळात आडकून न राहाता साथीदाराशी प्रामाणिक राहून आयुष्य जगणे गरजेचे आहे. कारण एक वाकडे पाऊल संसारात विरहाचे वळण आणू शकते.


एकमेकांच्या जमेच्या बाजू लक्षात घ्या : – दोघांनीही एकमेकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करून त्या गुणांच्या मदतीनेच संसाराचा गाडा सुरळीत चालवावा. केवळ कौतुकच नाही तर ते गुण आत्मसात करण्याचाही प्रयत्न करावा. यामुळे उणिवांची दरी भरून निघण्यास व नाते सुदृढ होण्यास मदत होईल. त्याच्या किंवा तिच्या उत्तम गुणांसाठी सर्वोत्तम प्रतिक्रिया दयावी व तशीच प्रतिक्रिया मिळविण्याचा प्रयत्नही करावा.


कमतरतांवर विजय मिळवा :- संसार करताना मतभेद होणारच. मात्र या मतभेदांचे रूपांतर वादात होता कामा नये. शक्य तितक्या लवकर सुवर्णमध्य निवडण्याचा प्रयत्न करावा. त्याला किंवा तिला जर एखादे काम एखादया विशिष्ट पद्धतीनेच करायला आवडत असेल व तुम्हाला तसे करणे शक्य नसेल तर मधला मार्ग निवडा. यामुळे कुणाचे मन दुखावणार नाही व फारशी तडजोडही करावी लागणार नाही. संसारात समर्पण सहनशिलता व प्रेम आवश्यक आहे.


नवे आत्मसात करण्याची तयारी ठेवा :- दोन भिन्न व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक गोष्टी नव्याने कळतात. त्याचा किंवा तिचा छंद हा त्यातीलच एक भाग असतो. अशावेळी परस्परांच्या आवडी-निवडी व कला गुणांचा आदर करा. याबाबत जाणून घ्या व वेळोवेळी प्रोत्साहन दया. लहान-सहान गोष्टींची तक्रार करत बसण्यापेक्षा समजस्याने घ्यावे. थोडीशी तडजोड करण्याची तयारी ठेवल्यास आयुष्यभराचे सुख मिळते हे लक्षात असू द्यावे.


नात्याला थोडा ताजेपणा देऊ या! :- कोणतीही गोष्ट शाश्वत नसते असे म्हटले जाते. नात्याच्या बाबतीतही हे खरे आहे. सुरुवातीला प्रेमाच्या नात्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा, ओढ, काळजी या सर्व भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. काळ पुढे सरकतो तशा या भावना हळूहळू बोथट होऊ लागतात. एकमेकांबद्दल क्षणोक्षणी विचार करणार्‍या पती-पत्नीचे एकमेकांकडे दुर्लक्ष होऊ लागते. हे केवळ पती-पत्नीच्या बाबतीत नव्हे तर प्रियकर-प्रेयसीच्या बाबतीतही घडते. स्त्रिया जास्त भावूक असल्याने त्याचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम उरलेले नाही हा विचार त्यंना सतातवत राहतो. मात्र, नात्याचा हा तिढा कसा सोडवावा हे उमगत नाही. पतीचे आपल्यावरील प्रेम पूर्णपणे संपुष्टात आलेले नसले तरी ते कमी झाले आहे, हे वारंवार जाणवते. अशा वेळी डोके धरुन बसण्यात काय अर्थ आहे?


चला, नात्याला थोडा ताजेपणा देऊ या! नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकेंबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? नात्यामध्ये कोणीही उच्च किंवा नीच नसल्याने मोकळेपणाने आपला दोष स्वीकारला तर जोडीदाराला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याने माझ्यासाठी अमूक केले पाहिजे, ती माझी जबाबदारी नाही असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक बाबीमध्ये दोघांनी समान वाटा उचलावा, म्हणजे एकावर दडपण येणार नाही. आणि एकमेकांच्या साथीने काम पूर्णही होईल.


स्त्रियांना खूप बोलण्याची सवय असते. त्या स्वत:ची गाडी पुढे दामटवण्यात इतक्या रमतात की समोरच्याला काही बोलायचे आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. यामुळेही नात्यात दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपले म्हणणे पुढे रेटण्यापेक्षा जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा!

देवबाप आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देवो!

प्र


No comments:

Post a Comment