*२ राजे ४:८-१०*
*प्रभूचे वारंवार येणं*
*ओळखले काय?*
*ती आपल्या नवऱ्यास म्हणाली , हा पुरुष वारंवार या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते*. *२ राजे ४:९*.
बायबल या स्त्रीचे नाव सांगत नाही पण तिचा *थोर स्त्री* असा उल्लेख मात्र करते.काय कारण आहे तिचा थोर म्हणून उल्लेख करण्याचे? कारण हा अलीशा जो होता तो देवाचा सेवक, संदेष्टा होता हे तिने ओळखले होते. म्हणून ती त्याला आपल्या घरी बोलावून जेवू घालायची. एवढया वरच ती थांबली नाही तर तिने आपल्या पतीच्या संमतीने अलीशासाठी एक खोली बांधली.त्यात खाट, मेज, खुर्ची, समई ठेवली. *त्याची सेवा ते पतिपत्नी मनापासून करीत होते. याचे तिला अनपेक्षित आशीर्वाद मिळाले*. ती वांझ होती आणि तिने न मागताही अलीशाने तिला आशीर्वाद दिला व तिला मुलगा झाला.
आज आमच्याही जीवनाच्या वाटेवरून प्रभू येशू ख्रिस्त रोज ये जा करीत असतो.. *कधी भक्तीपर गीताच्या द्वारे, कधी पवित्र वाचनाच्या माध्यमातून, कधी अध्यात्मिक लेखा द्वारे , उत्तम व भिडणारा संदेश ऐकून , तर कधी देवाच्या सेवकांच्या भेटीद्वारे..प्रश्न हा आहे की आम्ही ओळखतो का ह्या प्रभू येशूचे आमच्या जीवनात वारंवार येणं?* जसे त्या थोर स्त्रीने ओळखलं होते. *जर ओळखले आहे तर काय करतो आपण प्रभू येशू साठी? तिने धाब्यावर खोली बांधली, आम्ही आमच्या अंतःकरणात ख्रिस्तासाठी जागा तयार करू. त्या थोर स्त्रीने खाट अलिशाला विसावा मिळावा म्हणून ठेवली , आपण ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून त्याला विसावा देऊ, त्या पतिपत्नीने मेज ठेऊन सहभागीतेचा लाभ घेतला, आपणही ख्रिस्ताच्या सहभागीतेत जाऊ, खुर्ची ठेवीत तिने अलीशाच्या बसण्याची सोय केली , आपण आपल्या हृदयाच्या सिंहासनावर ख्रिस्ताला बसवू. प्रकाशासाठी समई ठेवली तिने, आपणही पवित्र वचनाची समई सतत तेवत ठेऊन त्या पवित्र वचनाच्या प्रकाशात वाटचाल करू आणि *जसे त्या थोर स्त्रीला अनपेक्षित आशीर्वाद मिळाले ते आपणही मिळवू!!फलहीन जीवन सोडून फलदायी जीवन जगू*.
*मात्र गरज आहे प्रभू कधी, कुठे, कसा आमच्या जीवनाच्या वाटेवरून ये जा करतो ते ओळखण्याची!!!*
*प्रभू येशु ख्रिस्ता तू वारंवार आमच्या जीवनात येतोस , तुझं हे येणं ओळखण्यास आमचे अध्यात्मिक नेत्र उघड*🙏🏻
No comments:
Post a Comment