Friday, 23 October 2020

अग्निवर्ण घोड्यावरील स्वार - रक्तपात


*प्रकटीकरण भाग — 13*

*शिक्का 2- अग्निवर्ण घोड्यावरील स्वार - रक्तपात*


           प्रियांनो, वचन सांगते, *प्रभु येशू ख्रिस्ताने* दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले.  तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. (प्रकटीकरण 6:3‭-‬4) पवित्र वचनात सांगितल्याप्रमाणे अग्निवर्ण घोडा हे रक्तपात युद्ध सगळीकडे हाहाकाराचे प्रतिक दर्शवतो. पहिल्या तीन महिन्यांतच ख्रिस्तविरोधक पृथ्वीवर शांती स्थापन करत नाही किंवा शांती स्थापन करणे त्याला शक्य नाही हे लक्षात येते. *प्रभु येशू ख्रिस्ताचे*  विश्वासणारे कोट्यावधी लोक *स्वर्गारोहण* झाल्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे काय झाले हे न समजल्यामुळे पृथ्वीवर राहिलेले त्या त्या कुटुंबातील इतर लोक आपआपल्या नातेवाईकांना शोधायला सुरवात करतील परंतु कायदा सुव्यवस्था नसल्यामुळे रिकाम्या घरांची लूट करणे, विरोध करणार्‍यांना ठार मारणे अशाप्रकारे सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले असेल. कुटुंबीयांना शोधणारे देखील या लूटमार करणार्‍या हातून मारली जातील. तसेच ख्रिस्तविरोधकाची सत्ता सर्वांनाच मान्य नसेल. त्यामुळे ख्रिस्तविरोधकाचे विरोधक त्याच्या विरुद्ध बंड करतील किंवा युद्धही करतील त्यामुळे सर्वत्र लोक एकमेकांना जीवे मारताना दिसतील. मोठी तलवार ही फार मोठा रक्तपात दर्शवते. अशाप्रकारे जगातील शांतता काढून घेतली जाईल. जग अतिशय अशांत झालेले असेल.

          परंतु *प्रभु येशू ख्रिस्ताला वेळीच स्वीकारणारे स्वर्गात प्रभुसह सहभागितेचा अवर्णनीय आनंद घेत असतील. प्रभुला धन्यवाद.* जे *देवपिता, प्रभु येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा या त्रिएक देवावर* विश्वास ठेवतात तेच फक्त *प्रभुच्या कृपेने स्वर्ग राज्यात* आनंदात असतील. परंतु *पिता पूत्र पवित्र आत्मा* या मधील कोणालाही नाकारणारे किंवा *त्रिएक देवासोबत* अन्य मनुष्य व संतांकडे प्रार्थना करणारे, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे महाक्लेषापासून सुटू शकत नाही. वचन सांगते,  *स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकला जावा,  आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.* (फिलिप्पैकरांस पत्र 2:10‭-‬11) *प्रभु* शिवाय अन्य कोणालाही दैवत मानणार्‍या प्रत्येक व्यक्तीला महासंकटाच्या काळात या सर्व पीडांना सहन करावे लागणार आहे. 


*सर्व लोकांनो ............................*


*देवाच्या शब्दाकडे लक्ष द्या.................*      


*प्रभु येशू ख्रिस्तालाच......................*


*आपला तारणारा म्हणून स्विकारा.............................*


*अन्य सर्व मनुष्यमात्र आहेत.............................*


*ते मृत पावले आहेत*............................

*किंवा सुखलोकात आहेत.*............................

*ते देव नाहीतच*.............................


केवळ *प्रभु येशू ख्रिस्तालाच* शरण जा आणि आजच नव्हे आत्ताच *प्रभु येशू ख्रिस्ता समोर गुडघे टेका.* लक्षात ठेवा जिवंत असताना *प्रभु येशू ख्रिस्ता पुढे* गुढघे टेकले नाहीत तर न्यायाच्या दिवशी टेकावेच लागतील. परंतु तेथे न्याय होईल परिणामी शासन नरकाचे शासन होईल. प्रियजनहो अजून वेळ गेलेली नाही *पवित्र शास्त्र स्वतः वाचा.              समजून घ्या.              प्रार्थना करा की पवित्र आत्मा समजून सांगेल म्हणून.              पवित्र शास्त्र जे अयोग्य म्हणते ते करुन              पापाचे भागीदार होवू नका,              प्रभुच्या क्रोधाला कारण होवू नका              तर प्रभुला स्विकारा              केवळ प्रभु येशू ख्रिस्ताचेच शिष्य व्हा.              पवित्र शास्त्रात नसलेल्या शिक्षणापासून दूर पळा. पवित्र आत्मा सर्वांना मार्गदर्शन करो. आमेन.*


No comments:

Post a Comment