आध्यात्मिक ऐक्य आपोआप घडत नसते
इफिस.२ः११-१८
शास्त्रलेखात उल्लेखलेले ऐक्य हे ख्रिस्ताच्या शरीरातील प्रत्येकामध्ये असलेले, म्हणजेच ज्यांनी ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारले आहे त्यांच्यामधील आध्यात्मिक ऐक्य आहे. याचा अर्थ हा की, आपणांमध्ये असलेले ऐक्य हे नेहमीच शास्त्रलेखातील सत्यावर आधारित असावे, आणि सत्य आपल्याला हेच सांगते की, ख्रिस्त कोण आहे व आपण त्याच्यामध्ये कोण आहोत. शास्त्रलेखातील येशू ख्रिस्ताविषयीच्या शिकवणीशी समझोता करणार्या कोणत्याही ऐक्याला देवाची मान्यता नाही. तरीदेखील सध्याच्या काळातील ऐक्याची चळवळ ही केवळ एकत्र येण्यासाठी केलेल्या ऐक्याशी जास्त संबंधित आहे असे दिसते. प्रत्यक्षात काही गटांना स्वतःची विश्वासाची तत्त्वे नाहीत, तरी ऐक्याच्या नावाखाली त्यांच्यासाठी शास्त्रलेखातील शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. असे गट देवाच्या प्रीतीवर भर देण्याचा प्रयत्न करतात व ज्यांच्याबरोबर आपण सहमत होऊ शकणार नाही अशा लोकांबरोबर सामंजस्याने कार्य करण्यास सांगतात. प्रीतीवर भर देण्याच्या नावाखाली - देवाच्या प्रीतीवर भर देण्याच्या नावाने सत्याचा बळी देणे हे साहजिक आहे, पण त्याचे पवित्र आदर्श व न्यायाच्या बाबतीत नाही. जर तेथे विश्वासणारे असतील तर संस्थात्मक ऐक्य काही वाईट नाही. पण विश्वासणार्यांनी अविश्वासणार्यांबरोबर काम करण्यासाठी आपल्या संदेशाचा समझोता करायचा हे चूक आहे, मग कारण किती का चांगले असेना!
जेव्हा पौल म्हणतो आपण, ‘‘आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा’’ (इफिस.४ः३), ‘झटत जा’ हे जे शब्द वापरले आहेत, त्यांचा मूळ अर्थ घाई करणे असा आहे. त्यानंतर त्यांचा अर्थ आवेशी किंवा उत्सुक असणे किंवा अधिक लक्ष पुरवणे असा झाला. प्रत्येक विश्वासणार्याने त्याचे सर्व लक्ष ख्रिस्ताच्या शरीरातील सुसंवाद टिकवण्याकडे लावले पाहिजे. हे आध्यात्मिक ऐक्य आहेे की, जे ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ओळखतात त्यांच्यामध्ये आहे, पण हे ऐक्य केवळ त्याच्याबरोबरच्या सहभागितेत चालण्यानेच टिकवले जाते.
_पाहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे! (स्तोत्र.१३३ः१)._
No comments:
Post a Comment