Friday, 9 October 2020

वचनाची अजिंक्यता

 वचनाची अजिंक्यता

*परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?यिर्मया 23:29*


*1)माझे वचन अग्नीसारखे*– *देवाचे वचन शुद्ध करणारी अग्नि आहे* .ज्या प्रकारे सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्नीत टाकतात व त्याच्यालीत मळ किंवा इतर घटक निघून जातात त्याच प्रकारे देवाचे वचन त्याच्या लोकांच्या जीवनातील अशुद्धता ,जगीकता इत्यादि साफ करणारी अग्नि आहे .

*वचनाच्या अग्नीच्या प्रकाशात देवाचे लोक त्यांची अपात्रता व स्वधार्मिकतेचा अपुरेपणा पाहतात* व त्याच प्रकाशात ख्रिस्ताचे निमत्वाचे  पुरेपणा दिसतो .

*वचनाच्या अग्नीच्या उबदारपणामुळे संतांना सांत्वन मिळते व देवावर व इतर संतांवर प्रेम करण्यास प्रोत्साहन देते.*

*जसे अग्नीचा परिणाम विविध गोष्टींवर निरनिराळ्या प्रकारे होतो तसेच देवाच्या वचनाचा सुद्धा परिणाम संतांवर व अभक्तांवर निरनिराळ्या प्रकारे होतो.*

*देवाच्या लोकांसाठी शुद्ध करणारे अग्नि तर अभक्तांसाठी भस्म करणारी अग्नि आहे.*


*2)खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?*

*मानवाचे हृदय हट्टी व पापामुळे कठोर झालेले असते व अंतकरणातील गर्व व अहंकार फोडण्याची गरज असते म्हणून देवाच्या वचनाचा हातोडा हवा आहे जो मानवाला आधी फोडतो मग अंतकरणाला आत्मिक आरोग्य देते व मनाचे नूतनीकरण करते.*

*देवाचे वचन हे उत्कृष्ट साधन आहे . दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असे शस्त्र आहे*.

*ते जिवन देणारे बी आहे .ह्रदयरुपी जमिनीत पेरल्यावर पवित्र आत्मा पाणी देऊन नवीन जन्माचे झाड उत्पन करतो ,त्यास आलेल्या फळांनी देवाचे गौरव होते .*

-सुवार्ता जीवन आहे व पूर्ण जीवनासाठी आहे

No comments:

Post a Comment