Wednesday, 7 October 2020

उपयोगी पात्र

 

विषय:-आपण देवाला उपयोगी पडण्याच्या अगोदर आपण त्याच्या अधिन झाले पाहिजे .! !


    बाप्तिस्मा करणारा योहान येशूला पाहून म्हणाला . हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा .पुढे तो असे म्हणतो आत्मा कबुतरांसारखा आकाशातून उतरत असताना व त्याच्यावर स्थिर राहीलेला मी पाहीला.- योहान1:29-32.

...पवित्र आत्मा प्राप्त होण्याची पहिली पायरी म्हणजे कोंकरू होणे. कोंकरू हे नम्रतेचे प्रतिक आहे. (यामध्ये भावनिक .नम्रतेला स्थान नाही).जो पर्यंत आपण नम्र  होत नाही तो पर्यंत पवित्र आत्माचे कबुतर आंम्हावर उतरत नाही...

एक उदाहरण..-एका व्यक्तीला त्याच्या कामाच्या वेतणाबद्दल त्याला एक जंगली घोडा देण्यात आला.. 

त्याने त्या घोड्याला शिकविण्यासाठी एका ग्रहस्थाला  शंभर रूपये दिले. काही दिवसांनी तो ग्रहस्थ घोडा घेऊन आला व म्हणाला मी या घोड्याला शिकविले आहे. .. त्याला विचारले दोन्ही बाजूंनी या घोड्यावर बसता येईल का. ? तो ग्रहस्थ म्हणाला नाही फक्त डाव्या बाजुनेच बसता येईल... मालक म्हणाला माझा मुलगा या घोड्यावर बसणार आहे .हे लक्षात आणा म्हणून उजव्या बाजुने बसण्याची घोड्याला सवय करा ..मग मालकाने त्या ग्रहस्थाला अजून शंभर रूपये दिले व म्हटले उजव्या बाजनेही लौकर शिकवून घोडा आणा व तो ग्रहस्थ पुन्हां घोडा शिकविण्यासाठी घेऊन गेला...


यातआपणास काय समजले?

रानटी घोड्याला माणसाळविणे कींवा शिकविणे  म्हणजे घोड्याला स्वतःच्या इच्छा मारावयास लावणे  व माणसाच्या इच्छेनुसार वागायला लावणे  मगच तो मनुष्याच्या उपयोगी पडतो..

तुमच्या लक्षात यातील मध्यवर्ती कल्पना आली काय?

जो पर्यंत आपण स्वतःचे मन इच्छा मारीत नाही .तो पर्यंत देवाच्या बाबतीत आपण त्या रानटी घोड्यासारखे आहोत..


समजा देवाची अशी ईच्छा आपणा बद्दल आहे की आपण अमुक एका मार्गाने जावे . पण आपण भलत्याच मार्गाने जातो. आपली स्वेच्छा कधीच आपोआप कमी होत नाही.

आपण देवाला उपयोगी पडण्याच्या अगोदर आपण त्याच्या आधीन झाले पाहिजे...

घोडा एक भव्य बलाढ्य जनावर आहे त्याचे मोल सुद्धा जास्त असेल पण जो पर्यंत तो घोडा मालकाच्या इच्छेप्रमाणे करावयास तय्यार नसतो तो पर्यंत तो कवडीमोलाचा व निरूपयोगी असतो..

आपणही तसेच आहो आपणही कितीही गुणवान. शिकलेले. अनुभवी . आकर्षक. कर्तबगार वगैरे ..वगैरे असलो तरी जो पर्यंत आपण आपलाच मार्ग निवडतो  व आपण स्वप्रयत्नानी आपल्याच अक्कलेने चालतो आणि देवाच्या अधीन होत नाही तो पर्यंत आपण देवासाठी अगदीच निरूपयोगी आहोत . हे लक्षात घेणे महत्त्वाचे होय .

म्हणून जितक्या लौकर आपण पुर्णपणे त्याच्या अधीन होऊ तितक्या लौवकर आपण त्याच्या सेवेसाठी लायक ठरविले जाऊ ..

आमेन.


No comments:

Post a Comment