*रोम ८:३१-३९*
*रोजच उपकारस्तुती*
*आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करीत जा*. *इफिस ५:२०*
माझा मुलगा लहान म्हणजे पाच वर्षाचा होता आणि त्याला सायकल हवी होती. नेहमी प्रमाणे मी त्याला म्हणाले आपण प्रार्थना करू देवबाप्पाची इच्छा असेल तर तो देईल.. यावर तो म्हणाला आई देवबाप्पाला असं नको सांगू की तुझी इच्छा असेल तर दे, त्याची इच्छा नसली तर मग? तू सायकल देच असं म्हण मग तो देईलच.. त्याचा हा भाबडेपणा पाहून मला हसू आलं. पण पुढे तो जे म्हणाला त्या त्याच्या विचाराने मात्र मी अंतर्मुख झाले. तो म्हणाला, *आई तू नेहमी नवी वस्तू घेतली की देवबाप्पाचे उपकरस्तुती करायला लावतेस ना , मग सायकल मिळाल्यावर परत देवबाप्पाचे उपकार मानायला संधी मिळेल ना*.. *थोडक्यात त्याच्या मनावर हे कोरलं जात होतं की काही तरी नवीन वस्तू घरात आली तरच देवाचे उपकार मानायचे असतात. इतर वेळी कशाला उपकार मानायचे*?. आणि ह्या त्याच्या तयार होत असलेल्या वैचारिक बैठकीची मला काळजी आणि भीती वाटली.
दावीद राजा म्हणतो , *माझ्या मुखात तुझे स्तवन सतत असेल*.आयुष्यभर त्याला युद्धाला तोंड द्यावे लागले,ही टांगती तलवार कायमच त्याच्या डोक्यावर होती तरीही त्याच्या मुखात देवाची उपकरस्तुतीच होती.. कारण रोज सकाळी नव्यानं होणाऱ्या देवाच्या कृपेच्या वर्षावाची त्याला अनुभूती येत होती. आपण घर घेतले, गाडी घेतली, बाळ झाले, वाढदिवस असला की देवाची स्तुती करतो, हे उत्तमच आहे, केलीच पाहिजे कारण तोच गरजा पूर्ण करतो. पण ह्या गोष्टी रोज रोज आमच्या आयुष्यात घडत नाहीत..
पण एक गोष्ट अशी आहे की जी रोजच आमच्या जीवनात आमच्या बरोबर,आमच्या बाजूने,आणि आमच्यासाठी असते , तिला अंत नाही ती म्हणजे *प्रत्यक्ष प्रभू येशूचा सहवास आणि त्याची प्रीती*!!! आणि यासाठीच आम्ही देवाचे रोज आणि रोज उपकार मानलेच पाहिजेत. कारण रोम ८चे पहिले वचन सांगते की, *ख्रिस्तामध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाहीच आणि शेवटी वचन सांगते ३९,उंची,खोली,कोणतीही सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या मध्ये देवाची आपल्या वरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही*.. फक्त दैहिक आशीर्वाद मिळल्यावरच आभार मानायचे असे नाही तर त्याची प्रत्येक क्षणी आमच्यावर असणारी प्रीती,क्षमा, त्याची चोवीस तास लाभणारी समक्षता, कायमस्वरूपी मिळालेलं तारण यासाठी सदैव उपकरस्तुतीचा यज्ञ सादर केला पाहिजे
देवाचे एक सेवक यांनी देवाच्या प्रीतीचे *गणिताच्या* भाषेत फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, गणिताचे चार बेसिक तत्वे आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार.
*१) *देवाने आमच्या जीवनात कृपा मिळविली*.(add, बेरीज),
२) *जेव्हा कृपा मिळविली केली तेव्हा पाप वजा केले* .
३) *पाप वजा केले तेव्हा क्षमा बहुगुणीत (गुणाकार) केली* .
४) *क्षमा बहुगुणीत केली म्हणून आता देवाच्या जीवनातून आमचे विभाजन ( division, भागाकार) होऊ शकत नाही*
मग आता आम्ही देवाचे रोज उपकार का मानू नयेत!!
माझा मुलगा अक्षरशः खरंच सांगते रोज आणि रोज देवाची उपकारस्तुती करतो. यासाठी मी देवाचे रोज आभारच मानते..
*हे देवा सर्वच परिस्थितीत तुझे स्तवन आमच्या मुखात सतत असू दे*. *आमेन*..
No comments:
Post a Comment