Friday, 9 October 2020

प्रुथ्वीवरील शेवटच्या काळातील चिन्हे...

 " प्रुथ्वीवरील शेवटच्या काळातील चिन्हे..."


(मत्तय 24 ) मध्ये येशुने त्यांच्या शिष्यांला त्याच्या पहिल्या व द्वीतीय आगमना संबधित घडणार्या निश्चित अश्या घटना सांगितल्या आहेत.व या घटकेला, *"शेवटचा काळ"* असे शास्त्रात म्हटले आहे.

*(इब्री 1:1-2,2 )* *(तिमथ्थी 3:1-5)* वचनाद्वारे  नव्या करारामध्ये घोषना केली  आहे. येशुने त्यांना सांगितले की मणुष्याच्या जिवनात शेवटच्या काळात विवीध अश्या भयानक घटना घडताना तो पाहील , व त्यालाच दु:खसहनाची सुरवात असे म्हटले गेले आहे....

            "आपण घटना  पाहु..."


1) राष्ट्र राष्ट्रावर उठेल.

2)राज्य राज्यावर उठेल.

3)दुष्काऴ.

4) *मरी.*🤢

5)भुकंप.

6)छऴ/पाठलाग.

7)खोटा ख्रिस्त/खोटा संदेष्टा.

8)जगभर अन्याय.

9)सत्य त्यागाची व्रुत्ती.


..शेवटच्या काळामध्ये ह्या सर्व चिन्हामुळे भुतलावर व नभोमंडळावर सर्विकडे हाहाकार व चलबिचल माजेल..जशी वरील  क्रमांक 4 मधील *"मरी"* अर्थात त्याचे आपण  नवे नाव *"करोना"* याच्या भयाचा हाहाकार व चलबिचल हे शास्त्रात सांगितल्या प्रमाणे  आता आख्खे जग अनुभवु लागलेच आहे....


* सुर्य , चंद्र व तारे चिन्हे प्रकट करतील .


 *♦️आंतरराष्ट्रीय पातळीवर दु:ख /भय/व चिंता हि पसरेल.* "व ती आता पसरलेली आपण सर्वजन पाहतच आहोत..."


*♦️सुर्य व चंद्र अंधकारमय होतील.*


*♦️तारे गऴुन पडतील.*


*♦️मऩुष्याच्या पुत्राचे चिन्ह स्वर्गामध्ये प्रगटेल.*


ह्या भुतलावर राहणार्यांच्या घरापाशी जेंव्हा ही चिन्हे येतील तेंव्हा हे निश्चितच आहे की, शास्त्रात सांगितल्या प्रमाणे  *("शेवटचा काळ हा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे..")*


म्हणुन माझ्या प्रिय *विश्वासणार्यांनी* व *नामधारीं* ख्रिस्ती बांधवांनी आता स्व:तास ओळखावे व जपावे आणी तत्काऴ  स्व:तास अमंगऴ गोष्टींन पासुन आपले मुख फीरवावे व परमेश्वराचा  संपुर्ण मनाने व संपुर्ण जिवेने तत्काऴ त्याचा धावा करावा,  काय जाणो तो कदाचीत तो त्याच्या लोकांवर दया दाखवुन   *"मरी" "करोना"* अश्या या भयान रोग, पिढेतुन तो आम्हांस सुरक्षीत ठेवुन   निश्चितच आम्हांवर तो *"करुना"* करील....


प्रभु आपणा सर्वांस चांगले असे आरोग्य देवो व सर्वांस त्याच्या बहुमुल्य अश्या पवित्र रक्ताने धुवुन शुध्द करो..

     

No comments:

Post a Comment