*मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रु पाहिले आहेत; मी तुला बरे करितो. तू आज पासुन तिसर्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील*. २ राजे २०:५
प्रियांनो वचनामधे आपण पाहतो की, हिज्किया राजा आजारी होता, त्यावेळी यशया संदेष्ट्याद्वारे परमेश्वराने आपली योजना हिज्किया राजा विषयी प्रकट केली,की तो मरणार आहे. परंतू हिज्किया राजाने परमेश्वरा कडे प्रार्थना केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली व पुन्हा यशयाद्वारे त्याला सांगितले की त्याचे आयुष्य १५ वर्षानी वाढविले आहे व तो *तिसर्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाईल*.
प्रियांनो या ठिकानी आपण पाहतो की, हिज्कियाची प्रार्थना परमेश्वरांने ऐकली परंतू त्याला लगेच बर केल नाही, तर तिन दिवसांचा आवधी दिला. परमेश्वर त्याला त्याच क्षणाला आरोग्य देऊ शकला असता परंतू परमेश्वराने त्याला तिन दिवसांचा आवधी दिला.
प्रियांनो आपण पाहतो की, येशूने एका क्षणात अनेक आजारी लोक बरे केले.परंतू हिज्किया राजाबाबत परमेश्वराने तिन दिवसांचा आवधी घेतला. कारण परमेश्वर जे काही🔥 करतो ते योग्य समयी त्याच्या इच्छेनुसार करतो.
अनेक वेळा आपण प्रार्थना करतो,आणि आपेक्षा करतो की परमेश्वराने आपली प्रार्थना लगेच ऐकावी. परंतू योग्य समयी परमेश्वर आपल्या प्रार्थनेचे उत्तर नक्किच देतो.
No comments:
Post a Comment