■ स्तोत्र वाचन :- ११२
■ संदेश विषय:- "अध्यात्मिक प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या"
"अध्यात्मिक जीवनाची वाढ"
"मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे."
इब्रि ५:११-१४
खर्या ख्रिस्तशिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता
11ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायचे आहे; ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात.
12वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात.
13कारण दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक आहे;
14पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
इब्री लोकांस पत्र 6
1तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चात्ताप, देवावरचा विश्वास,
2आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया पुन्हा न घालता, आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.
3देव होऊ देईल तर हे आपण करू.
4कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले,
5आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणार्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली,
6ते जर पतित झाले तर त्यांना पश्चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात.
7कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणार्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो.
8पण जी भूमी काटेकुसळे उपजवते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट जाळण्यात आहे.
फिलिप ३-१२ते१४
12एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे.
13बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून,
14ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.
योहान चे पहिले पत्र २ -३ते६
3आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो.
4“मी त्याला ओळखतो” असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही.
5जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहोत.
6मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.
No comments:
Post a Comment