लग्नाच्या जोडीदाराचा मृत्यू
उत्पत्ती ३५:१६-२०
राहेलीने बाळाचे नाव बेन-ओनी ठेवले. त्याचा अर्थ ‘माझ्या दु:खाचा पुत्र.’ तथापि याकोबाने बाळाचे नाव ‘बन्यामीन’ ठेवले. त्याचा अर्थ ‘माझ्या उजव्या हाताचा पुत्र’. राहेलीचा मृत्यू हा याकोबाचे एक खोलवरचे दु:ख होते. ती वेदना सहन करत मरण पावली, परंतु तो विश्वासात विजयी झाला आणि त्याने बाळास ‘उजव्या हाताचा पुत्र’ हे नाव दिले.
त्याच्या आयुष्यातील अत्यंत मोलवान व्यक्ती देवाने काढून घेतल्यावरही याकोबाने देवासाठी विजयी भूमिका घेतली. राहेलीचा मृत्यू आणि पुरले जाणे यामुळे हारानातील भूतकालीन दैहिक जीवनाशी असलेली त्याची नाळ तुटली. तो तेथे पत्नी मिळवण्यासाठी गेला होता आणि अनेक दैहिक कृतींद्वारे अपराधी ठरला होता. ‘‘मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला; तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे’’ (उत्पत्ती ३५:२०). जी त्याच्यासाठी अत्यंत मूल्यवान होती तिच्या स्मरणार्थ त्याने तो स्तंभ उभा केला.
याकोब बेथेलास परतल्यामुळे आणि त्याने देवाबरोबरची सहभागिता पूर्णपणे पुन:स्थापित केल्यामुळे, देवाच्या आज्ञेचा दुसरा भाग पूर्ण करणे आता त्याला शक्य होणार होते, ‘‘तू... आपल्या आप्तांकडे परत जा’’ (व.३१:३). या प्रकारे याकोब त्याचा बाप इसहाक, जो मम्रेमध्ये राहत होता, तिकडे मार्गस्थ झाला. तेच ते मम्रे जिकडे याकोब चालला होता, पण मुलास जन्म देताना राहेल मार्गातच मरण पावली.
_देव, तो धन्यवादित असो... तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वत: देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे (२करिंथ.१:२-४)._
No comments:
Post a Comment