Tuesday, 13 October 2020

*सार्वकालिक सुरक्षा

 *इब्री ११ : ७.*


          *सार्वकालिक सुरक्षा*

           *फक्त ख्रिस्तामध्ये.*


     *पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्वकाही म्हणजे मानव , पशु , रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला ; ती पृथ्वीवरून नाहीशी झाली ; नोहा व त्याजबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले.*

          *उत्पत्ति ७ : २३.*


       नोहाला देवाने तारू तयार करायला सांगितले होते, कशासाठी तर नोहा आणि त्याचं कुटूंब यांच संरक्षण करण्यासाठी.

कारण परमेश्वर जलप्रलयाने जगाचा नाश करणार होता.कारण लोकांच पातक फार वाढले होते.  नोहाने परमेश्वराने सांगितले तसेच तारू केले. म्हणून परमेश्वराच्या सांगण्यानुसार तो आणि त्याचे कुटुंब त्या तारवात गेले आणि सुरक्षित झाले . देवाच्या क्रोधापासून वाचले.धो धो कोसळणारा पाऊस , त्या भयानक लाटा , महाप्रलय हा म्हणजेच देवाचा क्रोध होता. 

    हे सर्व त्या तारवाला सहन करावे लागले पण तारवात असणारे  मात्र सर्व वाचले. *हे तारू म्हणजे प्रभू येशूचे प्रतीक आहे. आमच्या पातकामुळे परमेश्वराचा क्रोध जो आमच्यावर येणार होता  पण प्रभूने आमची पातके स्वतः वाहून नेली , प्रभू येशू पाप असा झाला ,म्हणून देवाच्या या क्रोधातून ख्रिस्ताला जावे लागले त्या  वधस्तंभावर, आम्हाला सुरक्षित करण्यासाठी !!*

   नोहाच्या  तारवात आठ लोक होते . आठ हा अंक  *नवीन सुरुवात* दाखवतो. *ख्रिस्तरूपी तारवात तेच प्रवेश करतात , जे ख्रिस्तामध्ये नवीन जीवनाची सुरुवात करतात. आणि मागील पातकी जीवनाचा त्याग करतात. प्रभू म्हणतो मी नवी उत्पत्ति आहे. जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे.* *ख्रिस्तामध्ये नवा जन्म हीच आमची नवीन जीवनाची सुरवात आहे*. 

    नोहा या शब्दाचा अर्थ आहे *विसावा* ( Rest ). नोहाला त्या तारवात सर्व संकटापासून सुटका झाल्याने विसावा मिळाला. *प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो , अहो कष्टी व भाराक्रांत जनहो तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.* *प्रभू येशू मधेच खरा विसावा मिळतो.*

    आज जगात जी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे असुरक्षित वाटते , पण घरी आल्यावर मात्र सुरक्षित वाटते. पण ही आमच्या घरातील सुरक्षितता तात्पुरती आहे.

  *आम्हाला सार्वकालिक सुरक्षितता हवी आहे म्हणून जर सार्वकालिक मृत्यूपासून सुटका हवी असेल , तसेच पापापासून , पापी जीवनापासून सुटका हवी असेल तर ख्रिस्त ह्या तारवात ,ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करीत , पश्चातापदग्ध अंतःकरणाने ख्रिस्ताकडे पूर्णपणे वळून ख्रिस्त ह्या तारवात प्रवेश करीत सर्वकाळासाठी सुरक्षित होऊन  प्रभूने देऊ केलेल्या विसाव्यात जाऊ जसा नोहा त्या तारवात सुरक्षित झाला आणि विसावला.* *कारण खरी सुरक्षा फक्त ख्रिस्त येशूमध्येच आहे.*

   *पित्या , ख्रिस्ताचा आम्ही आमचा तारणारा म्हणून स्वीकार केला आणि त्या तारवात तू आम्हाला सुरक्षित केलंस म्हणून तुझे आम्ही उपकार मानतो.* *आमेन.*

 

No comments:

Post a Comment