Tuesday, 27 October 2020

तुम्ही कशावर विश्वास ठेवता?



*तुम्ही कशावर विश्वास ठेवता?*

*कलस्सै.१ः१-८*


प्रत्येक जण विश्वासाविषयी बोलतो, कारण प्रत्येक जण कशा ना कशावर विश्वास ठेवणारा असतो. पण विश्वास विश्वासाच्या हेतूइतकाच महत्त्वाचा आहे. हे ओळखणे महत्त्वाचे आहे की, आपली दंडाज्ञेपासून सुटका केवळ विश्वासावर विश्वास ठेवून झाली नाही. पौलाने कलस्सैकरांचे त्यांच्या ‘ख्रिस्त येशूवरील’ विश्वासाबद्दल कौतुक केले (कलस्सै.१ः४).


म्हणूनच कोणाही व्यक्तीला ‘फक्त विश्वास’ ठेव असे सांगणे पुरेसे नाही. खरा प्रश्‍न हा आहे की कशावर विश्वास? शुभवर्तमानाचा संदेश हा तुमच्यावर, तुमच्या मंडळीवर अथवा एखाद्या सिद्धान्तावर विश्वास ठेवण्याचा नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा आहे. ह्यामध्ये ख्रिस्त जेव्हा तो आपल्याजागी वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने जे सर्व आपल्यासाठी केले ते अभिप्रेत आहे. हा विश्वास हे जाणून आहे की, आपण पापी मानव आहोत व दंडाज्ञेस पात्र आहोत, नाहीतर ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण्याची गरजच नव्हती. त्याचाच अर्थ, ख्रिस्त हाच आपली आशा आहे हे आपण जाणतो. जर आपण दुसर्‍या कोणत्या साधनाद्वारे तारले गेलो असतो, तर ख्रिस्ताला मरायची काही गरज नव्हती (गलती.२ः२१). ख्रिस्ताच्या ठायी विश्वास ठेवणे हेच सूचित करते की आपण आपला सर्व भरवसा त्याने वधस्तंभावर पूर्ण केलेल्या कार्यावर ठेवला आहे हे जाणून की, तो आपल्या पापांची क्षमा करतो व आपल्याला सार्वकालिक जीवन देतो.


सगळ्याचा सारांश हाच की, तारणदायी विश्वास म्हणजे येशू ख्रिस्त जो आपले जीवन व प्रभू आहे त्याच्याशी असलेली वचनबद्धता. येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्यावरील विश्वास आपल्याला ख्रिस्ती चालचलणुकीत वाढण्यासाठीही अत्यंत गरजेचा आहे.


_ते म्हणाले प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल (प्रेषित.१६ः३१)._



No comments:

Post a Comment