प्रश्न : *काही विश्वासी लोक आजही बोटात राशीच्या अंगठ्या घालतात, गळ्यात नको ते लॉकेट, आणि कानात स्टायलिश बाळी वगैरे तर अशा बाबतीत देवाचे वचन काय सांगते?*
बायबल मध्ये नव्या करारात स्त्रियांना निर्देश देत असताना संत पौल आणि संत पेत्राने काही सांगितले,
जरी ते स्त्रियांना सांगितले होते तरी तेच पुरुषांना ही लागू होते,अर्थात लेकी बोले सुना लागे.
राशिच्या अंगठी घालणे हे तर दूरची गोष्ट आहे,कारण आमची स्थिती व भाग्य कोणा राशींवर किंवा ग्रहांवर अवलंबून नाही ,तर ती देवाच्या कृपेवर अवलंबून आहे,जिथे देवाची कृपा आहे तिथे कोणा वस्थूची किंवा विशेष गोष्टीच्या माध्यमची गरज नाही.
पण तरी ही तो ह्यावर विश्वास ठेवतो तर तो व्यक्ती दुपटी माणूस आहे,त्याला सांसारिक राहण्याची आणि धार्मिक भासवण्याची सवय आहे,बाहेरून चुना लावलेला कबर आहे पण आतून पोकळ.
आणि काही लोक ह्याला फॅशन किंवा प्रदर्शन म्हणून घालत असतील तर बायबल त्याबाबती असे म्हणते की ,प्रथम त्यांनी योग्य तो पोशाख परिधान करावा ,त्या भिडस्त व मर्यादेने वागणाऱ्या असाव्यात.
स्वताला साजेल असा वेष म्हणजे काय ? म्हणजेच त्यांचे शरीर झाकलेले असावे ,त्यांनी आपले दागदागिने असले तरी ही दाखवू नये,
देवाची प्रार्थना करताना आपल्याला दागिन्यांचे प्रदर्शन करण्याची गरज काय? आपण प्रार्थनेत आले असताना मनोरंजनासाठी आलोय का ? लग्नाच्या मेजवाणीसाठी जमलोय का ? किंवा आपण कसला समारंभ साजरा करतोय का ,
आपणाला डामडौल शोभेल ,पण देवाची प्रार्थना करण्यासाठी त्याची आपल्याला आवश्यकता नाही .
आपण असे काही करू नये की ज्यामुळे लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल ,कदाचित तसे केले तर देवाच्या उपासनेत व्यत्यय येईल .आपले वेष लोकांचे लक्ष वेधले जाईल असा नसावा ,
पूर्वीच्या काळी सामान्य पुरुषांचे पेहराव साधंसुध असायचे ,ते लोक जडजवाहीर ,सोने ,चांदी असे जास्त काही घालत नसे,पण स्त्रियांचे मात्र वेशभूषा ,सौन्दर्यसाठी अनेक तर्हेचे दागदागिने ,केसांचे गुंफणे असायचे ,म्हणून त्यावेळी पुरुषांना ह्या विषयी काही निर्देश न देता सरळ स्त्रियांना निर्देश देण्यात आले की त्यांनी असे काही करू नये जेणे करून लोक तुमच्या कडे आकर्षले जातील आणि प्रार्थना मध्ये व्यत्यय येईल.
पण आजची स्थिती पाहता पुरुष लोक ही काही कमी नाही,जसे स्त्रिया करू पाहतात तसे पुरुष ही आपल्या सौन्दर्य वाढीसाठी केस वाढवणे व त्याला वेगवेगळ्या शैलीत गुंफून प्रदर्शन करणे,सोनं ,चांदी गळ्यात हातात घालून प्रदर्शन करणे असे चालू आहे,
म्हणून जे बायबल मध्ये स्त्रियांच्यासाठी वचन दिले आहे ते पुरुषांसाठी ही लागू होते कारण त्यांनी स्त्रियांन सारखे आपले सौन्दर्य वाढवू पाहिले .
1 तीमथ्याला 2:9-10
*त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला साध्यासुध्या वेशाने, नम्रतेने, मर्यादेने, शोभित करावे. त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या केसरचना करु नयेत. तसेच सोने, किंवा मोती किंवा महाग कपडे वापरु नयेत.*
*उलट देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करणे अगदी योग्य आहे.*
संत याकूब धनवान लोकांन विषयी म्हणतो जे आपल्या सोन्या रुपयांचा तौरा मिरवतात,
प्रथम त्याने त्यांच्या विषयी शोक केला
व म्हटले तुमचे धन नासले आहे ,तुमच्या वस्त्रांवर गंज चढला आहे ,त्याचे गंज तुमच्या हावरेपणाची साक्ष आहे तो अग्निप्रमाणे त्यांचा देह खाईल.
गंज चढणे म्हणजे काय? तुम्ही तुमच्या कडे घालण्यासाठी सोने रूपे ठेवलात,पण त्याचा उपयोग इतर गरीब व दरिद्री लोकांसाठी केले नाही,उलट ते अंगावर घालून त्याचे प्रदर्शन केले व ज्यांच्याकडे नाही त्याला लाजवले ,म्हणून हाच उपयोगात न आणणारे गंज तुमचा देह खाऊन टाकेल.
(याकूब 5:1-6)
1 पेत्र 3:3-4
*तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी.*
*त्याऐवजी तुमची सुंदरता अंतःकरणाची, जी कधीही नाश पावत नाही, अशी असली पाहिजे ती सौम्य, शांत स्वभावाची असली पाहिजे जी देवाच्या दृष्टीने अतिमौल्यवान आहे.*
म्हणून बायबलच्या म्हणण्यानुसार स्त्री असो की पुरुष दोघांनी स्वताला साजेल असे राहावे त्यात नटापट्टा नसावे.
*रोमकरांस 12:2 आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करु नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हांला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा.*
प्रभूमध्ये असणाऱ्या विश्वासी जणांनी याची *खबरदारी* घेणे अत्यंत आवश्यक आहे. वरीलप्रमाणे जर विश्वासी लोक *राशीच्या अंगठ्या, गळ्यात लॉकेट व इतर जगीक गोष्टी* परिधान करीत असतील तर ते निश्चितच प्रभुला आपल्या जीवनात *दुय्यम स्थान* देत आहेत. आणि जगीक पद्धतीने चालून स्वत: अंधकारात चालत आहेत.
प्रभु येशूने म्हटले की, *तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही?*
लूक 6:46
तसेच प्रभु येशूने असेही म्हटले, मला *‘प्रभूजी, प्रभूजी’* असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश *स्वर्गाच्या राज्यात* होईल असे नाही; तर *जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.*
मत्तय 7:21
म्हणूनच आज विश्वासी लोकांनी *स्वतःला पारखणे* आवश्यक आहे. जगीक गोष्टीमध्ये फसून स्वतःचा नाश करून घेण्यापेक्षा स्वर्गीय वचनाद्वारे मनपरिवर्तन करून स्वर्गीय राज्याचे वारसदार व्हा! हालेलुय्याह!!
प्रभु येशूच्या नावाने.... आमेन
No comments:
Post a Comment