*उत्पत्ति ४:३-१६*
*देणाऱ्यांची वृत्ती*
*विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली. तो मेला असुनही त्या विश्वासाच्याद्वारे अद्यापि बोलत आहे*.
*इब्री ११:४*..
सुप्रसिद्ध पर्शियन लेखक, *स्टीफन चारनॉक ( Stephen Charnock ) म्हणतात, 'अंतःकरणाशिवाय केलेली भक्ती म्हणजे स्टेजवर सादर केलेले नाटक आहे, तो केवळ अभिनय आहे. त्या व्यक्तीचे खरे जीवन नसते, हे ढोंग आहे*. काइनाने अर्पण आणले खरे पण ते देवाला मान्य झाले नाही. म्हणून त्याला राग आला. देवाने त्याला त्याची चूकीची वृत्ती ही दाखवून दिली, की तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होईल. नाहीतर पाप दाराशी टपून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, देव म्हणतो, *तुझे अंतःकरण योग्य असेल तर मला अर्पण मान्य होईल*..
का देव असे म्हणत आहे? काइनाचे काय चुकले? तर देवावरील विश्वासाचा अभाव त्याच्यात होता. आणि ह्याच अविश्वासामुळे काइनाचे जीवन नीतीचे नव्हते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, *तो फक्त कर्मकांड करीत होता*.. तुम्ही आणि मी काय असेच करीत असतो. सोमवार ते शनिवार देव नसल्यासारखे वागतो. आम्हाला जसे आवडते, हवे असते तसेच वागत असतो. जगरहाटीप्रमाणे आम्ही चालतो, वागतो. जग आणि जगातील गोष्टी यांच साम्राज्य आमच्यावर असते आणि आपल्याला ते आवडत असतेच. आणि आमची मानसिकता किंवा ठाम मत असे असते की, रविवारी एक तास चर्च मध्ये देवाच्या सानिध्यात घालवला; दान दिले की पुरेसे आहे. मान्य झाली आमची भक्ती!!.
पण भ्रमात राहू नये आपण. हे खरे नाही. *देव फक्त त्या भक्तीकडे ,दिलेल्या दानाकडे पहात नाही तर ती भक्ती अर्पण करणाऱ्या तुमच्या माझ्या वृत्ती कडे पाहतो*. आम्ही देवाला प्रामाणिकपणे सांगू शकतो की, प्रभू आम्ही उणे आहोत, तुला अपेक्षित परिपूर्णता आमच्यात नाही. चूका होतात पण त्या पुन्हा न करण्याचा प्रामाणिकपणा आणि पश्चातापी अंत:करण पाहिजे. *भक्ती, दान देणे म्हणजे रूढी, परंपरेप्रमाणे जाणे नाही*. लोकांनी पहावे म्हणून त्या परुशासारखे मोठ्याने प्रार्थना करणे, हात उंचावणे, दिलेल्या दशांशाचा उल्लेख सर्वासमोर करणे बायबल वाचणे ह्याला अर्थ नाही. *जर अंतःकरण समर्पित नाही तर सर्व ढोंगच आहे, नाटकच आहे. अनीती आहे*.
भक्ती म्हणजे देवाच्या आज्ञेमध्ये पुढे जात स्वतःला बदलणे गरजेचे आहे..
*देव फक्त उपासना, भक्ती, दान देणच फक्त पहात नाही तर उपासना करणारा कसा आहे त्याची वृत्ती कशी आहे हेही पाहतो*...म्हणून काइनासारखी नाही तर हाबेला सारखी उपासना मान्य होते..
प्रार्थना करू की *परमेश्वरा आमच्या ठायी हाबेला सारखा विश्वास, अंतःकरण आणि नीतिमान वृत्ती निर्माण कर.आणि खरेपणाने व आत्म्याने भक्ती करून घे*. *आमेन*...
No comments:
Post a Comment