सहजीवन
इफिस.५ः२५-३३
कोणताही विश्वासणारा आध्यात्मिक एकटेपणाचे जीवन जगू शकत नाही, कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत (इफिस.५ः३०). आपण एकमेकांना जबाबदार आहोत. इफिस.४ः२५ सांगते, ‘‘आपण एकमेकांचे अवयव आहोत.’’ म्हणूनच पवित्र आत्म्याने भरलेले विश्वासणारे जशी स्वतःला वागणूक देतात तशीच वागणूक ते इतर ख्रिस्ती सहकार्यांना देतात. आपण कोणावर अधिकार गाजवणारे नसावे, पण हे ओळखावे की, ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे, आणि आपल्याला अधीनतेचा आत्मा असला पाहिजे.
एकमेकांच्या अनुमतीने देवाची इच्छा पूर्ण करावी अशी आपली इच्छा आहे, म्हणून पवित्र आत्मा आपल्याला एकमेकांबरोबरचे सद्भावपूर्ण नातेसंबंध देईल. आपल्याला ‘देवाच्या भयामध्ये’ एकमेकांच्या अधीन व्हायचे आहे, की जे आदरयुक्त भय असावे, नाहीतर आपण देवाला असंतुष्ट करणारे किंवा त्याचा अनादर करणारे ठरू. ख्रिस्ताने जे सर्वकाही आपल्यासाठी केले, त्यामुळे आपण जे सर्वकाही करतो त्याद्वारे त्याला संतोष देण्याची आपली इच्छा असली पाहिजे. आपण त्याच्या व एकमेकांच्या अधीन राहिलो, तर सैतानाला आपल्या जीवनात वाव मिळणार नाही. इफिस.४ः२७ आम्हा विश्वासणार्यांना सांगते, ‘‘तर सैतानाला वाव देऊ नका.’’
विश्वासणार्यांचा सुसंवाद बिघडवणार्या मोहपाशांशी झगडण्यास ज्या कृपेची गरज आहे ती देवबाप पुरवतो. ’’तो अधिक कृपा करतो; म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा व सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून जाईल’’ (याकोब.४ः६-७). जेव्हा आपण पवित्र आत्म्याद्वारे अशा प्रकारचे नातेसंबंध ख्रिस्ताबरोबर ठेवतो, तेव्हा आपल्या जीवनात विविध नातेसंबंध ठेवण्यासाठी आपणांला योग्य आधार मिळतो, त्यांपैकी काहींचा उल्लेख इफिसकरांस पत्राच्या ५ व्या अध्यायामध्ये आहे.
_तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात (१करिथ.१२ः२७)._
No comments:
Post a Comment