*🌹 कृती 🌹*
*मग परमेश्वर मोशेला म्हणाला,माझा धावा काय करित बसलास? इस्राएल लोकांना सांग की पुढे चला*. निर्गम १४:१५
प्रियांनो वचन आम्हाला सांगते की,परमेश्वराला इस्राएल लोकांचा बचाव करावयाचा होता. मिसरी लोकांच्या गुलामगिरीतून त्यांना सोडवायचे होते. परमेश्वर आजही आपल्याला सांगत आहे की,आपल्या आजुबाजुला अनेक लोक आहेत जे पापात आहेत, देवापासुन दुर आहेत सैतानाच्या गुलामगिरीत आहेत.
प्रियांनो परमेश्वराला त्यांचाही बचाव करावयाचा आहे.त्यांचही तारण व्हावे अशी देवाची ईच्छा आहे.परंतू आम्ही फक्त प्रार्थनाच करत बसलो तर त्यांच्या पर्यंत देवाच वचन व🔥 सुवार्ता कशी पोहचेल. त्यांचासाठी प्रार्थना तर केलीच पाहिजे परंतू त्यांना देवाचे वचन आणि सुवार्ता सांगून प्रभूमधे आणले पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हणतो उठ माझा धावा काय करित बसलास.देवाची जी योजना त्याच्या लोकांसाठी आहे ती त्यांना सांगन गरजेच आहे.त्यांच्या पर्यंत पोहचवणे गरजेच आहे.
*ह्या प्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रियानाही तर तो जात्या निर्जिव आहे*. याकोबाचे पत्र २:१७ प्रियांनो आपल्या विश्वासाला कृतीची जोड असण गरजेच आहे. देवाच वचन त्याची तारणाची योजना त्याच्या लोकांपर्यंत आम्हाला घेउन जायची आहे. जेणे करुन त्यांचाही बचाव होईल, तेही या पापाच्या गुलामगीरितून मुक्त होतील.
*मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.*
1 योहानाचे 3:18
No comments:
Post a Comment