Friday, 9 October 2020

तारण

 


      तारण


*तारण म्हणजे काय हे? समजुन घेण्याकरता. तारण या शब्दाची व्याख्या समजुन घेणे अगोदर महत्वाचे व आवश्यक आहे*


तारण या शब्दाचा अर्थ म्हणजे, 

एखाद्या करारा मध्ये, एखादी चिजवस्तु किंवा एखादी गोष्ट (अस आपण सहज म्हणु शकतो) मिळवण्या करता, प्राप्त करण्याकरता, किंवा सोडवण्या करता तीच्याच तोलामोलाची किंवा त्यापेक्षा अधिक मोलाची दुसरी चिजवस्तु तारण म्हणुन देणे किंवा ठेवणे.


*उदार्णार्थ:-*

1) एखाद्या साहुकाराकडुन जेंव्हा पैशांच नगद कर्ज घेतल जात त्यावेळेस त्यापैशांच्या मोबदल्यात अधिक किंमतीच सोन त्या साहुकाराकडे *तारण* म्हणुन ठेवाव लागत.


2) एखाद्या वाहनावर ज्यावेळेस बॅकेकडुन कर्ज घेतल जात त्यावेळेस कर्जाची परत फेड न झाल्यास सदर वाहनावर कब्जा करुन ते विक्रि करण्याचे सर्व अधिकार कर्ज घेणाराला लिहुन द्यावे लागतात. त्याला *वाहन तारण* कर्ज म्हणतात.


*तारणाची* व्याख्या समजुन घेण्यास हे सरळ आणि सोपे *उदाहरण* आहे.

हा झाला *तारणा विषयी* सर्वसाधारण जगिक व्यवहार.


*आत्मिक तारण*

देवाने बनवलेला आदाम हा सुरवातीला *सिद्ध* मनुष्य होता. म्हणुन त्याला कोणतेही *(शारिरिक व आत्मिक)* *(शारिरिक मरण व आत्मिक मरण हा विषय वेगळा आहे)* मरण नव्हते. आदामाच्या देव आज्ञाभंगा मुळे त्याला मरण आले. नंतर आदामामुळे अनुवंशीकतेने जगात मरण आले. अनुवांशीक रित्या तेव्हा पासुन पवित्र शास्त्राच्या  नव्या करारा पर्यंत मरणाच राज्य अखंडीत होत व मरण अटळ होत.


याच कारण म्हणजे देव आज्ञांच भंग केलेल्या मानवाला (किंवा मानवा मधुन कोणा एकाला) जो पर्यंत पुर्णपणे देवाच्या आज्ञेत राहुन जीवन जगता येत नव्हत म्हणुन प्रत्येकाला दैहिक मरण येत होत.


*येशु ख्रिस्ताने* देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करुन व कुठलेही पाप न करता मानवी जीवन जगुन दाखवलेले आहे.

मरे पर्यंत येशुने देवाच्या आज्ञांचा भंग केला नाही म्हणुन त्याला मरणातुन पुन्हा जीवनात उठवले गेले, किंवा तो मरणातुन उठला, किंवा मरणातुन परत जीवनात उठण्यास समर्थ झाला, किंवा त्याला ते सामर्थ्य प्राप्त झाले.


आता येशुच्या द्वारे हे सिद्ध झाले कि, मनुष्य हा देवाच्या पुर्ण आज्ञा पाळण्यास समर्थ आहे व किंवा समर्थ होऊ शकतो व तो मरणातुन जीवनात येण्यास पात्र आहे किंवा पात्र होऊ शकतो.


येशु मरणातुन पुन्हा उठला व तो काय केल्याने मरणातुन पुन्हा उठला हे त्यावेळच्या लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते.  त्यानंतर मनुष्य (विश्वासणारे) येशुच्या शिकवणीचे व त्याच्या जीवनाचे अनुसरण करु लागला.

परंतु देहस्वभावा मुळे मनुष्याला एकाएकी स्वता मध्ये बदल करुन देवाच्या सर्व आज्ञा पाळणे अनेकांना शक्य नव्हते.


म्हणुन त्याकरता मनुष्याला काही कालावधीची संधी मिळावी याकरता त्या प्रकारचे जीवन जगुन *येशुने* सुरवातीला, सुरवात करुन देऊन आपले *स्वताचे पापरहित जीवन* देवाला सादर *(अर्पण/बली)* केले. व मनुष्याला पापरहित जीवन जगण्यास संधी व कालावधी उपलब्द करुन दिला.


जुन्या करारात *पापक्षमे* करता अर्पण व बली हि प्रथा होतीच परंतु ते अर्पण व बली *तात्पुर्त्या* पापा व कालावधी करता *सिद्ध* होत असत.


*येशुचे स्वताचे अर्पण सर्व पाप व सर्वकाळासाठी असे सिद्ध झाले.*


येशुच्या अर्पणामुळे सर्व मनुष्यजातीला *(जो कोणी येशुवर विश्वास ठेऊन त्याप्रमाणे जीवन जगेल तो)* देवाच्या इच्छेत सिद्ध होण्यास काही कालावधीची *संधी* मिळाली. हेच ते *तारण* आहे. हाच तो *कृपेचा काळ* आहे.


(कृपेच्या काळात मनुष्याला येशुच्या जीवनाचे अनुसरन करता यावे याकरता मनुष्याला सहाय्यक म्हणुन *पवित्रआत्मा* पाठवलेला आहे)


{ *सिद्धमनुष्य* जो पापा मुळे मृत झाला होता त्या मनुष्याला पुन्हा *सिद्धमनुष्य* अस बनवण्या करता व त्याची गमावलेली *सिद्धता* त्याला परत मिळावी म्हणुन त्याच्याच तोलामोलाच्या *सिद्धमनुष्याचे* अर्पण/बली आवश्यक होते.}


*तारण* आणि तेही *येशुने दिलेल तारण* किंवा *येशुमुळे मिळालेल तारण* याच स्पष्टीकरण इतक थोक्यात होण अशक्य आहे अस मला वाटत.



No comments:

Post a Comment