Tuesday, 13 October 2020

शस्त्रसामग्री धारण केलेले असा



*शस्त्रसामग्री धारण केलेले असा!*

*इफिस.६ः१०-१८*


ही शस्त्रसामग्री ठरावीक कालवधीनंतर धारण करून काढून ठेवता येत नाही; ती एकदा धारण केली की कायम तशीच राहू द्यायची असते. ही शस्त्रसामग्री म्हणजे विश्वासाची वृत्ती आहे आणि म्हणून ती अशा स्वरूपाची आहे की, ती स्वतःच्या इच्छेने केलेली कृती आहे व ती कायमस्वरूपी आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण परिपक्व होतो, तसे आपल्या जीवनातील अशी काही क्षेत्रे आपणांस दिसून येतील की, आपला विश्वास जितका बळकट पाहिजे तितका नाही, म्हणजेच आपली शस्त्रसामग्री कुठेतरी कमकुवत झाली आहे. अशा वेळी आपल्या कमकुवतपणाबाबत त्याच्या अभिवचनांचा अभ्यास करण्यासाठी आपण देवाच्या वचनाकडे वळणे ही आपली जबाबदारी आहे, यासाठी की, आपला विश्वास अधिक मजबूत व्हावा.


इफिस.६ः११ मध्ये ‘‘देवाची शस्त्रसामग्री धारण करा’’ आणि रोम.१३ः१४, ‘‘तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा’’ ह्या दोन वचनांमधील साम्य पाहा. विजयी जीवनासाठीची तरतूद देवाने प्रभू येशू ख्रिस्त या व्यक्तीमध्ये व त्याच्या वचनामध्ये केलेली आहे. 


प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केल्यावर, एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे जिवंत शब्द (येशू ख्रिस्त) हा लिखित वचनातून (पवित्र शास्त्र) प्रकट झाला आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या स्वकीयांसाठी अशी प्रार्थना केली, ‘‘तू त्यांना सत्यात पवित्र कर; तुझे वचन हेच सत्य आहे’’ (योहान.१७ः१७). जेव्हा आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो व ते सांगते त्याप्रमाणे आज्ञापालन करतो, तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करतो.


_आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा (इफिस.४ः२४)._




No comments:

Post a Comment