*मत्तय ६ : ७-१३*
*प्रार्थनेतील खरा आनंद*
*कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही , तर नितीमत्व , शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे .*
*रोम १४ : १७*
प्रभूने जी प्रार्थना शिष्यांना शिकवली त्यांच्या विनंतीवरून त्यामध्ये *पहिली गोष्ट प्रभूने त्या थोर परमेश्वराशी आमचं नातं हे मुलाचं जस अगदी जवळच आणि हक्काच नातं आपल्या पित्याशी असते ते जोडायला शिकवलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू , *हे आमच्या स्वर्गातील पित्या* असेही म्हणायला शिकवीत आहे. *आमच्या* म्हणजे पृथ्वीवरील *सर्वांचा पिता !! फक्त माझा म्हणजे एकट्यालाच असे नाही. कारण प्रभूला माहिती आहे की आपण ( मनुष्य )फार स्वकेंद्रीत आहे. मला मदत कर , मला बरे कर , माझ्या समस्या निवारण कर ,मला आशीर्वाद दे. ह्या आणि अशाच स्वतःपुरत्या प्रार्थना आमच्या असतात.आपण एकटेच त्या स्वर्गीय पित्याचे मूल नाही. हेच आमचं आत्मकेंद्रितपण निघावं म्हणून प्रभू येशू *आमच्या* शब्द जाणून बुजून वापरीत आहे. *तुझे नाम पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो*. या वचनात देवाविषयी आदर आणि देवाचे भय महत्वाचे आहे. *कारण देवाचे भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे असे बायबल सांगते.* *देवाचे भय पवित्र आत्म्याद्वारे सुज्ञ करते.* पण जोवर असे होत नाही तोवर आमच्या प्रार्थना म्हणजे ह्या स्वतःच्याच फक्त गरजांची यादी ( shopping list ) असते . पण जेव्हा हे देवाचे राज्य आमच्यात येते तेव्हा आमच्या प्रार्थनांचे स्वरूप बदलते. इतरांसाठी सुध्दा आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो आणि त्यात मोठा आनंद मिळतो.
*अशा प्रकारची प्रार्थना प्रभू येशु का शकवतो तर प्रार्थनेचा आणि जीवनाचाही खरा आनंद आपल्याला घेता यावा म्हणून.* आजचे प्रतीक वचन हेच सांगते की खाणे पिणे यात *देवाचे राज्य* नाही तर नितीमत्व , शांती , व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात आहे. कारण जेव्हा देवाचे राज्य मिळविण्यासाठी आम्ही झटतो तेव्हा ह्या जगातील आम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पिता गौरवाने पूर्ण करतोच करतो. आणि आमचा आनंद द्विगुणित करतो. कारण आमच्या स्वर्गीय पित्याला सर्वांचीच काळजी आहे आणि सर्वांवर पित्याचे प्रेम आहे.
*जर प्रार्थनेतील खरा स्वर्गीय आनंद मिळवायचा तर तो आमचा पिता आणि आम्ही त्याची मुले हे नातं आधी जोडलंच पाहिजे. आणि प्रार्थना ह्या स्वकेंद्रित नाही तर सर्वांसाठी केल्या पाहिजेत. हेच ह्या प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेचे मर्म आहे.*
*स्वर्गीय पित्या आम्हाला तुझी लेकरे होण्याचा व तुझ्या राज्यात सामील होण्याचा आशीर्वाद दिलास म्हणून तुझे उपकार मानतो*. *आमेन*..
No comments:
Post a Comment