Friday, 9 October 2020

नितीमत्व पेरणी

 


*तुम्ही आपणांसाठी नीतिमत्त्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्वराने येऊन तुमच्यावर नीतिमत्त्वाची वृष्टी करावी ह्याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.*

होशेय १०:१२

          प्रियांनो वचन आम्हाला सांगते की, पेरणी करा, जमीन नांगरुंन काढा. *आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो,  आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.  जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.  पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.”*

मार्क ४:२६-२९

या वचनामधे येशू दाखला देऊन सांगत आहे की, देवाच राज्य कसे आहे. शेतकरी आपल्या शेतामधे बी पेरतो ते बी केंव्हा  रुजते हे त्यालाही कळत नाही. 

           प्रियांनो आता पेरणीकरण्याचा काळ आहे. शेतकरी आपल्या शेतामधे अनेक पिकांची पेरणी करित आहे. पेरणी केल्यावर शेतकर्याला हे माहित नाही की पुन्हा पाऊस पडेल की नाही, आपलं पिक येईल की नाही. परंतू तो पेरणी करण्याच काम करतो. त्याला अपेक्षा असते की आपण पेरणी केली म्हणजे आपल्या हाती पिक नक्किच🔥 येईल.त्याच काम फक्त शेताची मशगत करुन पेरणी करण आहे.

            प्रियांनो अशाच प्रकारे आम्हाला देखील देवाचा राज्यासाठी देवाचा वाचनाची पेरणी करायची आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामधे आपण वचन पेरीत आहोत त्या व्यक्तीच तारण होईल की नाही, ती व्यक्ती प्रभुमधे येईल की नाही. हे सर्वस्वी त्या परमेश्वरावर अवलंबून आहे. आपल काम फक्त त्या व्यक्तीच्या जीवनात वाचनाची पेरणी करण आहे. आमची नियुक्ती फक्त परमेश्वराच्या वाचनाची पेरणी करण आहे.

*जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील.*

स्तोत्रसंहिता १२६:५




No comments:

Post a Comment