Friday, 9 October 2020

नेत्र उघडून पहा

 २ राजे ६ : १५-१७


           नेत्र उघडून पहा

मी आपली दृष्टी परमेश्वराकडे लावितो , परमेश्वरा पासून मला सहाय्य येते.

         *स्तोत्र १२१ : १-२.*


      अरामी लोक अलीशावर त्याला ठार मारून टाकण्यासाठी आले होते , अलीशा रहात असलेल्या नगराला मोठ्या सैन्याने वेढा दिला होता. अलीशाचा सेवक ते पाहून घाबरून गेला आता माझा स्वामी अलीशा आणि मी मरणार ही भीती त्याला वाटली. पण अलीशा शांत होता कारण त्याचा आपला देव परमेश्वर यावर पूर्ण विश्वास होता म्हणून तो परमेश्वराला प्रार्थना करतो की ह्या सेवकाचे नेत्र उघड  आणि त्याला दृष्टी दे. . आणि जेव्हा देवाने त्या सेवकाचे डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की अलीशा ज्या डोंगरावर होता तो परमेश्वराच्या सैन्याने अग्नीच्या  घोड्यांनी व रथाने व्यापून गेला होता. परमेश्वर त्याचं संरक्षण करीत होता. 

    *आज आपल्यालाही अनेक युद्धांना  जीवनात सामोरं जावं लागतं. समज गैरसमज आहेत , कटू संबंध  होण्याची शक्यता असते , आर्थिक समस्या , आजार  आहेत , कौटुंबिक प्रश्न त्रास देतात. अशावेळी आपण गोधळून जातो , हिम्मत हारतो . पण पवित्र वचन सांगते की देवाकडे दृष्टी लावा मग आमचे अध्यात्मिक  नेत्र देव जेव्हा उघडतो तेव्हा प्रभू स्वतः आमच्यासाठी लढतांना दिसतो कारण युद्ध आमचं नाहीच रहात जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा. कारण आता युद्ध हे देवाचे असते , देव आमच्यासाठी लढतो , आणि देवाला कोणीही हरवू शकत नाही. कारण  तो सर्वसमर्थ  सेनाधीश विजयी परमेश्वर आहे.*

    *परमेश्वर यशया ४१ : १३ मध्ये म्हणतो , " मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की , भिऊ नको , मी तुला सहाय्य करतो.* या वचनाची प्रचिती ख्रिस्तावर  विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला येतेच.जो त्याचा धावा करतो त्याला येते. मोशेने विश्वासाने देवाकडे पहात तांबड्या समुद्रावर काठी उगारली आणि मागे जे फारोचे सैन्य इस्राएल लोकांना मारण्यासाठी आले होते त्यापासून संरक्षण होण्यासाठी देवाने समुद्रात कोरड्या वाटा तयार केल्या. इस्राएल सुखरूप पैलतीरी गेले पण फारोचे सैन्य बुडून मरण पावले. 

     *प्रत्येकाच्या जीवनात कधी न कधीतरी हा अनुभव आला असेलच . समरण करू त्याचे आज आपण आणि परमेश्वराला उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पण करू!!*

     *सर्वसमर्थ ईश्वरा तु करीत असलेल्या अद्भुत संरक्षणाची अनुभूती घेण्यास आमचे आध्यत्मिक नेत्र उघड.*

           *आमेन*

       

No comments:

Post a Comment