Monday, 12 October 2020

तरुणपणी नाही तर केंव्हाच नाही

 इफिस. ६:१-९                                                                                                                             


*तरुणपणी नाही तर केंव्हाच नाही*



*“मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”  नीति. २२:६*


एका उपदेशकाने नव्याने जन्म पावलेल्या आपल्या श्रोत्यांना सांगितले, “तुमचा पालट वयाच्या कोणत्या वर्षी झाला ते लिहा. मग त्यांनी सर्वांची उत्तरे एकत्र करून निष्कर्ष काढला तो असा:

 १) वयाच्या विसाव्या वर्षी पालट झालेले – ५४८; 

२) वीस ते तीस या वयात पालट झालेले – ३३७, 

३) तीस ते चाळीस या वयात पालट झालेले – ८६, 

४) पन्नास ते साठ या वयात पालट झालेले – १३,

 ५) साठ ते सत्तर या वयात पालट झालेले – १.


आमच्या मुलांनी अल्पवयातच सुवार्तासंदेश ऐकणे अगत्याचे आहे हेच या आकडेवारीवरून स्पष्टपणे सिद्ध होते.


 तथापि आमच्या घरांमध्ये, मंडळ्यामध्ये मुलांना ख्रिस्ताकडे, ख्रिस्ती प्रभावाकडे आणण्याचे विशेष प्रयत्न होत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. 


इतर गोष्टींना विशेष प्राधान्य दिले जाते असे दिसते. काही दिवसापूर्वी मी “मुले कोठे आहेत?” या मथळ्याचा लेख वाचला. 


शहरामधील एका सुखवस्तू मंडळीच्या पाळकांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी कार्य सुरु केले. त्यांनी तेथील बहुतेक मुलांना वळवून आपल्या उपासना मंदिरात आणले व त्यांना तारणाच्या मार्गाचे शिक्षण दिले, 


पण या मुलांच्या पायांतील अस्वच्छ जोड्यांमुळे मंदिरातील गालिचा खराब झाला. 


कारभारी मंडळाने पाळकांना बोलावून या नुकसानीची चौकशी आरंभली. पाळक म्हणाले, समजा, माझा प्रभू हिशोब घेण्यासाठी मला बोलाविल, तेंव्हा मी म्हणेन, प्रभुजी, तू मला सोपून दिलेली ही मंडळी  पहा.


 इमारत अगदी चांगली सुस्थितीत आहे, गालिचा तर अगदी नवाच आहे, तर प्रभू मला शाबासकी देईल किंवा म्हणेल, मी तुला आत्मे जिंकण्यासाठी पाठवले होते ते आत्मे कोठे आहेत? मुले कोठे आहेत?


आमच्या मुलांना देवाच्या वचनातील सत्ये शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, 


हे खरे, पण त्यांच्यासमोर आपण वचनाप्रमाणे वागणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कसे वागावे हे शिकण्यात तासंचे तास खर्च केल्यावर, मग आपला उपदेश आपणच न पाळला, तर पालथ्या घड्यावर पाणी असाच प्रकार होईल. 



आमची लहान मुले बालवयात आमच्या तोंडून जे ऐकतात आणि आमच्या जीवनामध्ये जे पाहतात, त्याच्या आधारानेच ती सर्वकाळ कोठे  राहणार ते ठरणार आहे.


*“शब्बाथशाळेत लहानाची मोठी झालेली मुले क्वचितच न्यायालयात न्यायाधीशापुढे उभी राहतात !”

No comments:

Post a Comment