*मत्तय १९: १३-१५*
*येशूकडे नेऊ बाळांना*
*येशू म्हणाला , बालकांना माझ्याकडे येऊ द्या , त्यांना मनाई करू नका.*
*मत्तय १९:१४*
लहान मुलांना आपला सहवास, स्पर्श , आपलं त्यांच्या नजरेसमोर असणं फार हवंस वाटत असतं.. प्रेमाला ती भुकेली असतात. एक राजकीय पुढारी होते अमेरीकेतील. त्यांच्या मुलाच्या हट्टामुळे ते त्याच्या बरोबर फिरायला गेले.. नंतर त्यांनी आपल्या डायरीत लिहिले की *माझा आजचा दिवस वाया गेला..* त्याच दिवशी त्यांच्या छोट्या मुलानेही आपल्या डायरीत लिहिले की *आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुदंर आणि गोड दिवस होता !!* मुले ही सहवासप्रिय असतात.. आपली आणि प्रेम करणारी माणसे त्यांना जवळ हवी असतात...
*प्रेमळ प्रभू येशू आपल्या बाळावर हात ठेवतो हा विचारच किती सुदंर आहे!! दोन हजार वर्षांपूर्वी त्या मातापित्यांना सुद्धा वाटत होते की येशूने आपल्या बाळावर हात ठेवावेत. ते हात काय करीत होते ते त्यांनी पाहिले होते. *त्या हातात किमया होती आंधळ्याना दृष्टी देण्याची, त्या हातात आरोग्य होतं आजार बरा करण्याचं , त्या हातात सामर्थ्य होत केवळ स्पर्शानं मृतांना जीवंत करण्याचं , त्या हातात क्षमता होती मूक बधिरांना बोलत करण्याची !!!* *केवळ त्याच ख्रिस्तातच सामर्थ्य आहे आम्हाला आणि आमच्या मुलाबाळांना तारण देण्याचं सौख्य देण्याचं*. हे आपणही जाणलं पाहिजे.
*महान सेवक स्पर्जन म्हणत असत की ,"" मूळ सात वर्षाचं होण्यापूर्वी त्यांना स्वर्गाच्या मार्गाची ओळख करून द्या.""* *( Before a child reaches seven , teach him all the way to heaven )*
ज्यावेळी लोकांनी मुलांना ख्रिस्ताकडे आणले , तेव्हा स्वतः ख्रिस्ताच्या शिष्यांनीच त्यांना अडवले.. जे शिष्य अहोरात्र प्रभूच्या सहवासात राहत होते, चमत्कार पाहत होते, उत्तम शिक्षण प्रभूपासून त्यांना मिळत होते त्याच शिष्यांनी अडखळण आणले ! *म्हणजेच काय तर चोवीस तास जरी तुम्ही प्रभू येशूच्या सहवासात राहिला तरी पण ख्रिस्ताचा हेतू जाणून* *घेण्यापासून मात्र दूरच राहता.*
*कारण ख्रिस्ताच प्रीतीपूर्ण हृदय मात्र जाणलेलंच नसतं*
आज जर आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत तर त्याचे हृदय जाणलंय का? त्या प्रेमपूर्ण हृदयाचा स्पर्श झालाय का ?
आमच्या मुलांना किती ख्रिस्ताच्या जवळ नेतो आम्ही? *सर्व ठिकाणी मुलांना नेतो पण संडे स्कुल ला पाठवताना मात्र आपणच अडखळण होतो काय?* *जगाचं ज्ञान करून देणाऱ्या गोष्टी सांगतो पण ख्रिस्ताबद्दल बोलतो का? विचार करू आपण सर्वच!!*
*मुलांना येशूचे खरे शिष्य बनवण्यासाठी पालक हा परमेश्वराबरोबर पार्टनर असतो !!*
*सामर्थ्यशाली पित्या आमची मुले ख्रिस्ताच्या सहवासात वाढवीत म्हणून ख्रिस्ताच्या हृदयाशी आमची आधी जवळीक होउदे.*
*आमेन*...
No comments:
Post a Comment