Wednesday, 7 October 2020

ईश्वरी दृष्टान्त




*ईश्वरी दृष्टान्त न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य.*

        ( नीतिसूत्रे 29:18 )

   

    प्रियांनो जर दृष्टान्त नसेल तर आम्हाला कोणतेही लक्ष्य गाठता येत नाही  दृष्टान्त नसतांना काही करणे म्हणजे एक प्रकारे हवेत बाण मारण्यासारखा प्रकार आहे.

 

   नोहाला परमेश्वराने तारू बनवायला सांगितले तेव्हा त्याने दृष्टान्त पाहिला की काय होणार आहे आणि आपला बचाव कसा होईल या दृष्टीने त्याने तो दृष्टान्त आपल्या जीवनात आमलात आणण्यासाठी सुरवात केली आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा बचाव झाला.

*तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.*

इब्री लोकांस पत्र 11:7

      अब्राहामाने देखील आपल्याला झालेल्या दृष्टांता प्रमाणे विश्वासाने कृती करायला सुरुवात केली आणि आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करायला देखील मागेपुढे पाहिले नाही. कारण देवाने त्याला अगोदरच सांगून ठेवले होते,


             ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : *“अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”  मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”*  अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास 🔥परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला.

उत्पत्ती 15:1‭, ‬5‭-‬6


पौलाला देखील एक दृष्टान्त होता, त्याबद्दल तो राजा अग्रीपाला म्हणतो,

*म्हणून, अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टान्त अवमानला नाही;*

प्रेषितांची कृत्ये 26:19


आणि तिमाथ्याला देखील लिहितो,

*जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे;  आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या1 सर्वांनाही देईल.*

2 तीमथ्याला 4:7‭-‬8


म्हणून आम्हाला देखील दृष्टांत असला पाहिजे  की प्रभूंचे राज्य मिळवण्यासाठी मी काय करायला पाहिजे आणि धाव पुर्ण करण्यासाठी मी कशाप्रकारे रोज सराव केला पाहिजे यासाठी एक दिवस मुख्य मेंढपाळ येईल आणि आम्हाला पारितोषिक देईल.


*मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.*

1 पेत्राचे 5:4

No comments:

Post a Comment