Friday, 9 October 2020

प्रार्थना

 *१ थेस्सल ५ : १६-१८*


               *प्रार्थना*


    *तर सर्वात प्रथम हा बोध मी   करतो   की ,  सर्व माणसांसाठी  विनंत्या , प्रार्थना , रदबदल्या व उपकारस्तुती करावी.*

*तीमथ्याला पहिले पत्र २ : १*


     प्रार्थना या विषयावर बोलत असताना आमच्या मंडळीच्या पाळकसाहेबांनी त्यांना आलेला अनुभव  सांगितला की , एका कुटूंबातील एक व्यक्ती खूप आजारी होती आणि ती व्यक्ती दवाखान्यात ICU मध्ये होती. घरच्या लोकांनी पाळक साहेबांना प्रार्थनेसाठी बोलावले म्हणून तेथे पाळकसाहेब गेले. पण बाहेर जे नातेवाईक होते त्यांच्यात आजारी व्यक्तीच्या संबंधाने चर्चा चालू होती की त्यांचा अंत्यसंस्कार कोठे आणि कसा करावा. हे ऐकून पाळकसाहेबांना खूप वाईट वाटले आणि त्यांच्या अविश्वासाबद्दल संतापही आला , कारण ती व्यक्ती अजून जिवंत होतीच. पण ह्या लोकांचा प्रार्थनेवर विश्वास नव्हता. केवळ एक सोपस्कार म्हणून आणि शेवटची प्रार्थना पाळकांनी  केली हे बेगडी समाधान त्यांना हवे होते. पाळकसाहेबांनी ICU मध्ये जाऊन प्रार्थना केली. आणि परमेश्वराने उत्तर दिले. १०/१५ दिवसांनी त्यांना घरी सोडले . ती व्यक्ती  अद्यापही   विश्वासाने चांगले आरोग्यदायी जीवन जगत आहे.

     *परमेश्वर म्हणतो हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचे अंतःकरण  मात्र माझ्यापासून दूर आहे*. ह्या कुटूंबाच्या बाबतीत हेच घडत होते , म्हणजे ते प्रार्थना करीत होते , इतरांनाही प्रार्थनेची विनंती करीत होते पण त्यांचे अंतःकरण  मात्र अविश्वासामुळे प्रभूपासून दूर होते. विश्वासाचा अभाव होता.

     *जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा ती आत्म्याच्या प्रेरणेनेच केली पाहिजे. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेनेच प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा.* *इफिस ६:१८*

    *प्रार्थनेत विश्वास महत्वाचा आहे. याकोब ५ : १५ हे वचन सांगते , विश्वासाची प्रार्थना ही दुःखणाइतास वाचविल.* 

   *आजच्या शास्त्रपाठात असे सांगितले आहे की निरंतर प्रार्थना करा , सर्व स्थितीत उपकारस्तुती करा ; कारण तुम्हांविषयी  ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा आहे आपण प्रार्थना करावी ही.*

     *म्हणूनच जे सर्वजण प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनी प्रार्थना ही आत्म्याच्या प्रेरणेने , अंतःकरणाने , आणि मनात शंका न घेता पूर्ण विश्वासाने व निरंतरपणे केली पाहिजे.  प्रसंग आनंदाचा असो , दुःखाचा असो किंवा रोजचे जीवन जगताना सुध्दा प्रार्थना आम्ही केलीच पाहिजे देवबाप अशा प्रार्थनांची उत्तरे देतो.* 

    *प्रार्थनामय जीवन  हा ख्रिस्ती जीवनाचा श्वास आहे.*

   *प्रभू येशू  ख्रिस्ता आम्हाला स्वतःसाठीच केवळ नाही तर  इतरांसाठी सुध्दा खरेपणाने व आत्म्याने , विश्वासाने प्रार्थना करणारे* *असे अंतःकरण दे.  आमेन.*

   

No comments:

Post a Comment