*नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे लोक जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तुही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलण्यावरून तू कोण आहेस हे दिसून येते*. मत्तय २६:७३
प्रियांनो वचनामधे आपण पाहतो की पेत्राने येशुचा नाकार केला. तेथे जमलेले लोक त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाले की, तूही त्यातलाच आहेस तुझ्या बोलण्यावरून तू कोण आहेस हे दिसून येते.
प्रियांनो या ठिकाणी आपण पाहतो की, पेत्र येशुच्या सानिध्यात राहिल्याने येशुचे जे स्वभाव गुण आहेत ते त्याच्यामधे उतरले होते. आणि ते त्याच्या बोलण्यावरून दिसत होते. प्रियांनो जर देवाच वचन आम्हाला सांगते की आम्ही देवाची लेकरे आहोत तर मग आमच्या बोलण्यावरून हे लोकांना दिसत आहे का की हे जिवंत देवाची लेकरे आहेत?
प्रियांनो हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारण गरजेच आहे की खरच आम्ही देवाची मुलं आहेत काय? आणि आमच्यातून आमचा देव जर दिसत नसेल तर आम्हाला आमच आत्मपरिक्षण करण गरजेच आहे. आम्ही खरच येशुमधे आहोत का?
*तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसेकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे*. कलसै ४:६
प्रियांनो या ठिकानी वचन आम्हाला सांगते की, जर आम्ही प्रभुमधे आहोत तर आमच बोलण हे इतरांना आवडणार असाव. आपल्या बोलन्याद्वारे लोक आशिर्वादीत व्हावेत. कृपायुक्त म्हणजे आपल्याला मिळालेली कृपा इतरांनाही मिळाली पाहिजे. कारण आमच तारण कृपेन विश्वासाच्याद्वारे झालेल आहे.🔥
*तुमचा छळ करनार्यानां आशिर्वाद द्या, आशिर्वादच द्या शाप देऊ नका*. रोम १२:१४
प्रियांनो येशुला धरण्यासाठी आलेल्या याजकाच्या सेवकाचा जेंव्हा पेत्राने कान कापला तेंव्हा येशूने त्यांस म्हटले की, माझा पिता मला मदत पुरविणार नाही का? जर येशू मेलेल्यांना जिवंत करु शकत होता तर मग त्याच्या बोलण्याने जिवंत मेले नसते का? येशूने जर त्यांना शाप दिला असता तर एकाचवेळी सर्व मेले असते परंतू येशूने तसे केले नाही. ज्यांनी त्याचा छळ केला त्यांना शाप न देता आशिर्वाद दिला. जर आम्ही त्या येशुवर विश्वास ठेवणारे आहोत त्याला अनुसरनारे आहोत तर आमच्या बोलन्याद्वारे आम्हालाही इतरांना आशिर्वादीत करायच आहे.
म्हणून प्रियांनो आमची वाणी, आमचे शब्द हे ख्रिस्ताचे असले पाहिजे.त्याचे गुण आमच्यामधे असले पाहिजेत म्हणजे इतरांनाही समजेल की आम्ही त्या ख्रिस्ताचे आहोत.
No comments:
Post a Comment