💐 धैर्य 💐
*धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.*
प्रकटीकरण 3:10
प्रियांनो आज संपूर्ण जग हे मरीच्या विळख्यात आहे, आणि प्रत्येक जण स्वतःला व आपल्या प्रिय जनांना सुरक्षित कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करत आहे.
परंतु सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे परमेश्वराचे सानिध्य होय, म्हणून जो कोणी परमेश्वराच्या सानिध्यात राहून त्याचे ऐकतो तो सुरक्षित राहतो.
म्हणून परमेश्वर म्हणतो,
*धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.*
प्रकटीकरण 3:10
आज इच्छा असूनही अनेक लोक कोरोना रोग्यांना मदत करू शकत नाहीत कारण त्यामध्ये त्यांना स्वतःला भीती वाटते. कारण स्वतः अनेक डॉक्टर आणि नर्स यांना देखील या रोगाची लागण झालेली आहे. परंतु जर आम्ही त्या परमेश्वराला शरण जातो तर तो आम्हाला यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी मदत करतो.
*कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.*
इब्री लोकांस पत्र 2:18
म्हणून बंधुनो घाबरून जाऊ नका तर देवाच्या सानिध्यात आणि त्याच्या कृपेत राहून त्याच्या वचनाचे मनन करा.
*तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.*
निर्गम 20:20
कारण👇
*ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने🔥 करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.*
1 पेत्राचे 1:7
No comments:
Post a Comment